डुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच म्हणजे 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 11, 2017, 09:50 AM IST
डुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार title=

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच म्हणजे 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

पुणे-सोलापूर महामार्गावर उरळी कांचनजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात घडलाय. इनामदार वस्तीजवळ रस्त्यावर समोरून डुक्कर आडवं आल्यानं टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला... आणि ही बस बाजुच्याच कठड्याला धडकली... त्यानंतर कठडा तोडून या बसनं समोरून येणाऱ्या ट्रकलाही जोरदार ठोकर दिली.


भीषण!!!

अपघातग्रस्त ट्रॅव्हलर सोलापूरहून पुण्याकडे जात होती... तर ट्रक पुण्याहून सोलापूरकडे जात होती.

पहाटे 4.00 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. मृतांमध्ये मुलुंडच्या 9 जणांचा समावेश आहे तर 2 जण नारायण गावचे रहिवासी आहेत. यामध्ये 6 महिला तर 5 पुरुषांचा समावेश आहे.


भीषण!!!

मृतांची नावे... 

1. विजय काळे

2. ज्योती काळे

3. योगेश लोखंडे

4. जयवंत चव्हाण

5. योगिता चव्हाण

6. रेवती चव्हाण

7. जगदीश पंडीत 

8. शैलजा पंडीत 

9. प्रदीप अवचट

10. सुलभा अवचट