शिर्डीत आदिवासी भिल्ल समाजाचे घर-मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन

शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची  वडिलोपार्जित घरे आणि लक्ष्मी देवीचे मंदिर पाडू नये, या मागणीकरिता शिर्डीतील आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासमवेत आंदोलन सुरु केले आहे. शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषणास सुरु आहे.

Updated: Jan 7, 2017, 06:40 PM IST
शिर्डीत आदिवासी भिल्ल समाजाचे घर-मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन title=

शिर्डी : शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची  वडिलोपार्जित घरे आणि लक्ष्मी देवीचे मंदिर पाडू नये, या मागणीकरिता शिर्डीतील आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासमवेत आंदोलन सुरु केले आहे. शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषणास सुरु आहे.

शिर्डी गावठाण हद्दीतील पालखी रस्ता पिंपळवाडी रोडला जोडण्यासाठी प्रशासन या मार्गावर वरील घरे पाडण्यात येत आहेत़ साईबाबांच्या काळात आप्पा जागले साईबाबांच्या सेवेत होते़ तेव्हापासून आमचे पूर्वज या जागेवर राहात आहे़ आता रस्ता करण्याच्या नावाखाली आम्हाला या जागेवरून हटवण्यात येत आहे़ याशिवाय या जागेतच असलेले आमचे कुलदैवत लक्ष्मीआईचे मंदिरही पाडण्यात येू नये, असे या नागरिकांच म्हणणे आहे.

घरांना आणि मंदिराला वळसा घालून जाणारा रस्ता सध्या वहिवाटीत आहे़. काही लोकांच्या आग्रहाखातर कारवाई सुरू असल्याचाआरोप या नागरिकांनच आहे. आमची घरे व मंदिर पाडण्यासाठी आग्रही असलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे़.