नाशिक : बनावट नोटा बनविण्याचे प्रकरण ताजे असतानाच आदिवासी आयुक्तालयाची बनावट वेबसाईट बनवून शेकडो बेरोजगारांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यात मोठ रँकेट कार्यरत असून आदिवासी विभागातीलच काही महाभागांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात आलाय. मुख्य सूत्रधार हेमंत पाटील उर्फ अमित लोखंडे, पप्पू उर्फ सुरेश पाटील तुकाराम पवार आणि उदयनाथ सिंग अशी ह्या चौघांची नावे आहेत. पहिले तिघे जन धुळे जळगाव मधले आहेत तर चौथा भाईंदरचा राहणारा आहे.
या चौघांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाईट तयार केली होती. बोगस कागदपत्रे, सही शिक्के बनवून आशार्माशाळेत शिक्षक भरतीसाठी ५० हजार ते १०- २० लाखां पर्यंत पैसे उकळले. २०११ पासून यांचा गोरख धंदा चालू होता, नाशिक पोलिसांना आलेल्या तक्रारी नुसार, चौकशी करून चार जणांना अटक करण्यात आलीय.
या चौघाकडून सीपीयू, हार्डडीस्क, वायफाय सेटअप, बनावट शिक्के , कागदपत्र कार असा मुद्देमाल जपत करण्यात आलाय. प्रथम दर्शनी यात ९ जणांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आलाय. मात्र आदिवासी विबागातील कोणाची साथ असल्या शिवाय गेल्या चार पाच वर्षापासून असा गोरखधंदा चालविणे शक्य नसल्याचा पोलिसांच दावा आहे.
त्यामुळे आदिवासी विभागातील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत.
हेमंत पाटील हा अमित लोखंडे या बनावट नावाने कारभार करत होता. त्याचे आणि त्याच्या साथीदारांचे आदिवासी आयुक्त्लायात कायम येणे जाणे होते. तिथले कर्मचारी या लोकांना सलाम ठोकायचे अशी माहिती देखील पोलीस तपासात पुढे येत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे.
घोटाळे, भ्रष्टाचार अनियमित कारभार यामुळे आदिवासी विकास विभाग कायमच चर्चेत राहिलंय आतातर बनावट वेबसाईट तयार करून उमेदवाराची फसवणूक करण्यातही अधिकाऱ्यांवर संशयाचे दाट धुके आहे.