तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका  हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 

Updated: Jan 3, 2017, 06:40 PM IST
तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस title=

उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका  हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 

हा तपास सीबीआयकडे वर्ग का करू नये असा सवाल केला आहे.  तुळजाभवानी मंदिरात १९९१ ते २०१० या २० वर्षांत संस्थान अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. याचा सध्या सीआयडी तपास करीत आहे. मात्र याचिकाकर्त्याने मागणी केल्यानं कदाचित आता हा तपास सीबीआयकडे जाऊ शकतो.