झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे

झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्षात तुरीच्या पंचनाम्यास सुरूवात झाली आ्हे. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे केले जावेत यासाठी झी 24 तासने पाठपुरावा केला. त्यानंतर पणनमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.

Updated: Apr 30, 2017, 08:21 AM IST
झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर सुट्टीच्या दिवशीही तुरीचे पंचनामे title=

नांदेड : झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर आता प्रत्यक्षात तुरीच्या पंचनाम्यास सुरूवात झाली आ्हे. सुट्टीच्या दिवशीही पंचनामे केले जावेत यासाठी झी 24 तासने पाठपुरावा केला. त्यानंतर पणनमंत्र्यांनी सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्याचे आदेश दिले. आता प्रत्यक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.

नांदेडमध्ये पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 तूर खरेदी केंद्र आहेत. 22 तारखेपर्यंत या तूर खरेदी केंद्रावर आलेल्या तुरीचे पंचनामे केले जात आहेत. आज सायंकाळपर्यंत पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी दिली आहे.