तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

इतकच नाही तर अद्यापही ही तूर खरेदी सुरु रहाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात दिली.

Updated: Apr 30, 2017, 06:34 PM IST
तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट title=

नागपूर : मागील सरकारनं केवळ 20 हजार टन तूर खरेदी केली.. मात्र नव्या सरकारनं त्यापेक्षाही अधिक तूर खरेदी करत शेतक-यांना दिलासा दिलाय.. इतकच नाही तर अद्यापही ही तूर खरेदी सुरु रहाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात दिली.

 दरम्यान या तूर खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे. काही व्यापा-यांनी शेतक-यांच्या सातबारा उताराचा आधार घेत तूरीची विक्री केल्याचं उघडकीस आलंय. अशा तूर खरेदीची  संपूर्ण चौकशी करून दोषी व्यापा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.