औरंगाबाद : जिल्हा कोर्टात खुर्चीच्या कारणावरून दोन वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्हा कोर्टामध्ये अड्व्होकेट मनोहर लोखंडे आणि रघुनंदन जाधव यांच्या आजूबाजूला बसण्यासाठी खुर्च्या आहेत.
मनोहर लोखंडे यांनी त्यांच्याकडे एक पक्षकार आल्यानं त्यांनी जाधव यांची खुर्ची ओढून बसण्यासाठी दिली. याचं कारणावरून अड्व्होकेट लोखंडे आणि जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन याचं पर्यावसन मारहाणीत झाले.
रघुनंदन जाधव या वकिलाने आपल्या रुमालामध्ये दगड गुंडाळून मनोहर लोखंडे आणि त्यांची पत्नी कविता यांना जबर मारहाण केल्याचा आरोप लोखंडे यांनी केलाय.
लोखंडे यामध्ये रक्तबंबाळ झालेत त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा सगळा प्रकार जिल्हा कोर्टाच्या वकील कक्षात घडला आहे.