पुणे : पुण्यातील मस्तानी तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झालाय... लग्नाची पार्टी करण्यासाठी पाच तरुण दिवे घाटातील मस्तानी तलावात गेले होते. या पैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. अतिमद्य प्राशन केल्यामुळे हे दोघे बुडाल्याची माहिती समोर येतीये..
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री एकूण 5 जण पार्टी करुन सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मस्तानी तलावात पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यानंतर ही दुर्घटना घडली. या तरुणांनी मद्यप्राशन केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाकडून तलावात बोट उतरवण्यात आली असून दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. मृतांपैकी एकाचं नाव सुनील गायकवाड असल्याचीही माहिती मिळते
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.