'महामुंबई'त दोन नव्या महापालिकांचा प्रस्ताव

महामुंबई परिसरात (MMR Region) दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 'पनवेल-उलवे' आणि 'अंबरनाथ-बदलापूर' या दोन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. 

Updated: Dec 9, 2015, 11:51 AM IST
'महामुंबई'त दोन नव्या महापालिकांचा प्रस्ताव title=

ठाणे : महामुंबई परिसरात (MMR Region) दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 'पनवेल-उलवे' आणि 'अंबरनाथ-बदलापूर' या दोन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. 

'एमएमआरडीए'नं हा नवा आराखडा तयार केलाय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिलीय.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ कुळगाव बदलापूर नगरपालिकांचं एकत्रीकरण करून अंबरनाथ महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 

तर नवी मुंबईतील उलवे, नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर यांचा पनवेल महापालिकेत समावेश करून एक नवी महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
 
'एमएमआरडीए'च्या २६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत प्रारुप प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलीय. मुंबई महानगर नियोजन समितीकडून हे प्रारुप अंतिम करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या दोन्ही महापालिकांच्या निर्मितीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.