लोणावळा : रेल्वेगाड़यांमध्ये फेरीवाल्याचे काम करणाऱ्या दोघांना पहाटेच्या झोपेमध्ये असतानाच अंगावर पेट्रोल-रॉकेल ओतून जाळण्याचा दुर्दैवी प्रकार बुधवारी पहाटे लोणावऴयातील रेल्वे वसाहतीमध्ये घडला.
या घटनेत अतुलसिंग भदोरीयाचा म्रृत्यू झाला. सचिन प्रतापसिंग हा गंभीररित्या भाजला आहे. अतुलसिंग आणि सचिन हे रेल्वेगाड़यांमध्ये फेरीवाल्याचे काम करीत होते. रेल्वे वसाहतीमध्येच एका भाड्यानं खोली घेतली. बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ते दोघे झोपेमध्ये असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
या प्रकारामध्ये अतुलसिंग हा ९० टक्के भाजला तर सचिन हा ८५ टक्के भाजल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात अतुलसिंगचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचे कारण अदयाप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अतुलसिंग याचे त्याच्या काही सहकाऱ्यांशी भांडण झाले होतं. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी एका संशयीतास अटक केली असून पुढील तपास ते करीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.