अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या लोणी धवलगिरी प्रकल्पात शेतकऱ्याने जलआंदोलन सुरु केले आहे. घनश्याम आंडे असं या आंदोलक शेतकऱ्याचं नाव आहे.
लोणी धवलगिरी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेताच्या वहिवाटीचा रस्ता गेला. त्यामुळं शेतात ये-जा करताना शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. पर्यायी रस्ता आणि पूल तयार करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी घनश्याम पाच वर्षांपासून करत आहेत.
मात्र, पाटबंधारे विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्यानं अखेर त्यांनी जलआंदोलनाचा मार्ग अवलंबला. प्रकल्पाच्या चबुतऱ्यावर मध्यभागी बसून त्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. मात्र गेल्या ४८ तासांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतर प्रशासनाकडून घनश्याम आंडे यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.