सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

शहरालगत सातारा-देवळाई इथं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात झालीय.

Updated: Dec 4, 2014, 09:26 AM IST
सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा  title=

औरंगाबाद : शहरालगत सातारा-देवळाई इथं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात झालीय.

आपल्यावर कारवाईच होऊ शकत नाही, या अविर्भावात असलेल्या बिल्डरांमध्ये कारवाईमुळे खळबळ उडालीय. एक एफएसआय मंजूर असताना दुप्पट, तिप्पट एफएसआय वापरून बांधकाम करणा-या बिल्डरांना नगरपालिका प्रशासनाकडून नोटीस दिल्या होत्या. मात्र त्यांना बिल्डरांनी केराची टोपली दाखवली होती.

मात्र प्रशासनानं अखेर आता पाडापाडीला सुरुवात केलीय. प्रशासनानं ३१८ बहुमजली इमारतींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र सध्या उभ्या असलेल्या आणि रहिवासी असलेल्या इमारतींबाबत मात्र अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.

मात्र जे नागरिक घर घेवून राहण्यास गेले आहेत त्यांचे मात्र घराचं स्वप्न या कारवाईत धुळीस मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.