पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहनं टोलमुक्त

टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पिवळ्या पट्टाचा वापर केला जात आहे. पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहने टोल मुक्त करण्यात यावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष खारेगाव टोल नाका येथे उभे राहून पिवलेपट्टे मारून घेतले.

Updated: Aug 16, 2016, 12:00 AM IST
पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहनं टोलमुक्त title=

ठाणे : टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पिवळ्या पट्टाचा वापर केला जात आहे. पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहने टोल मुक्त करण्यात यावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष खारेगाव टोल नाका येथे उभे राहून पिवलेपट्टे मारून घेतले.

शिंदे यांनी यावेळी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लेन्थ आणि मनुष्यबळ वाढवण्याचे आदेश दिले.महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्याने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.