कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

कल्याणच्या बैलबाजार परिसरात सर्फराज सय्यद या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला, यात सर्फराज हा गंभीर जखमी झालाय, जखमी सरफराजला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Updated: Jun 7, 2015, 10:58 PM IST
कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार title=

कल्याण : कल्याणच्या बैलबाजार परिसरात सर्फराज सय्यद या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला, यात सर्फराज हा गंभीर जखमी झालाय, जखमी सरफराजला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आज दुपारी 5 वाजतच्या सुमारास ही घटना घडली, सर्फराज याला फोन करून कोणीतरी बैलबाजार परिसरातील वल्लीपिर चौकात बोलावले होते, सर्फराज हा दुचाकीवरुन बैलबाजार जवळील वल्लीपिर येथे गेले असता भर रस्त्यात तेथे आलेल्या इसमाने सर्फराजच्या डोक्यात गोळी झाड़ली आणि तो इसम दुचाकी वरुन पसार झाला, महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांच्या 4 टीम आरोपीला शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

सर्फराज याची गुन्हेगारी पाश्वभूमि असून काही दिवसा पूर्वी स्काय वॉक वर सुरु असलेल्या फेरी वाल्यांच्या धंद्यात त्याचा कोनाशि तरी वाद झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.