सांगली आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सांगलीत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ४० अंशाच्या आसपास पोहचलेला पारा वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे खाली घसरला तर दुसरीकडे लातूरमध्येही अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. लातूरमध्ये सोसाट्याच्या वा-यामुळे आंब्याला मोठा फटका बसला. जर अवकाळी पाऊस असाच सुरु राहिला तर आंबा, द्राक्ष बागांसहित ज्वारीलाही मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.