राजीव गांधी योजना अधिक झाली 'फलदायी'!

गरजू ज्येष्ठ  नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता गुडघा शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलाय. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय. 

Updated: Sep 2, 2015, 02:36 PM IST
राजीव गांधी योजना अधिक झाली 'फलदायी'! title=

मुंबई : गरजू ज्येष्ठ  नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेत आता गुडघा शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलाय. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत माहिती दिलीय. 

ही योजना संपूर्णत: 'कॅशलेस' आहे. पेशंटला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेमध्ये हॉस्पिटलमधील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, जेवण, तसेच एक वेळ परतीचा प्रवास खर्च याचा समावेश आहे. राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना कोणत्याही खर्चाशिवाय या सुविधा उपलब्ध होतात.

हृदयविकारावरील अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेमधील तीन स्टेंटपर्यंतच्या खर्चासह फिजीओथेरपीचा खर्चही या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया / औषधोपचार व १२१ फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.