कुंभमेळ्यावर 'स्वाईन फ्लू'ची वाकडी नजर, ९ बळी!

कुंभमेळ्यावर सध्या नाशिकमध्ये फैलाव झालेल्या स्वाईन फ्लूचं सावट आहे. कुंभमेळ्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेलाय तर अऩेक साधूंना स्वाईन फ्लूची लागण झालीय.

Updated: Sep 2, 2015, 12:55 PM IST
कुंभमेळ्यावर 'स्वाईन फ्लू'ची वाकडी नजर, ९ बळी! title=

नाशिक : कुंभमेळ्यावर सध्या नाशिकमध्ये फैलाव झालेल्या स्वाईन फ्लूचं सावट आहे. कुंभमेळ्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेलाय तर अऩेक साधूंना स्वाईन फ्लूची लागण झालीय.

नाशिकच्या साधूग्राममध्ये सध्या अनेकजण मास्क लावून फिरत आहेत. नाशिकमध्ये सध्या स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाय. कुंभमेळ्यासाठी आलेले भाविकही मास्क लावून फिरत आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या आकडेवारीनुसार जिल्हा रूग्णालयाअंतर्गत २६१ पैंकी २०० संशयीत तर ६१ पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. गेल्या आठ महिन्यात १८ बळी गेलेत. तर शहरात ३८ बळी गेलेत. कुंभपर्व सुरू झाल्यापासून यात वाढ झालीय, असं  जिल्हा शल्य चिकित्सक माले ईडी यांनी म्हटलंय.  

साथीच्या आजारांचा प्रकोप होऊ नये यासाठी साधूग्राममध्ये प्रशासनाने स्वतंत्र १०० बेडचं हॉस्पिटल उभारलं आहे. जिल्हा रूग्णालयात दोनशे बेडचं आणि प्रत्येक पार्कींगच्या ठिकाणी उपचार कक्ष उभारण्यात आलेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेचे उपसंचालक बी डी पवार यांनी दिलीय.

अजून एक महिना याच वातावरणात कुंभमेळ्याच्या पर्वण्या होणार आहेत. त्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भाविकांनी अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.