वसई-विरार पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र रिंगणात

वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.

Updated: May 30, 2015, 10:42 AM IST
वसई-विरार पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र रिंगणात title=

वसई : वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया रद्द करून मॅन्युअल पद्धतीने उमेद्वारी अर्ज दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे आमदार हितेन्द ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर या वसईच्या ९८ क्रमांकाच्या प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरल्यात. त्यामळे आता हि निवडणूक चुरशीची झाली आहे.

महापौर पद हे महिलांसाठी राखीव असल्याने प्रवीण ठाकूर या महापौर बनण्याची शक्यता आहे. महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आज या फॉर्मची छानणी होणार असून १ जून रोजी फॉर्म मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर २ जूनपासून प्रचाराची रंगत पाहायला मिळणार आहे. येत्या १४ जूनला महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.