वसई विरार महापालिकेत आमदार हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व

वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.

Updated: Jun 16, 2015, 03:36 PM IST
वसई विरार महापालिकेत आमदार हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व title=

पालघर : वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.

पालिकेच्या एकूण ११५ जागा असलेल्या वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच बहुजन विकास आघाडीने आघाडी घेतली होती. 

दुपारी @ १२.४०

बविआ - १०५ जागांवर विजयी

शिवसेना - ६ जागांवर विजयी

भाजप - १ जागेवर विजयी

अपक्ष - २ जागेवर विजयी

काँग्रेस - १ जागेवर विजयी

सकाळी @ ११.४०

बविआ - ९५ जागांवर विजयी

शिवसेना - ३ जागांवर विजयी

सकाळी @ ११.३०

बविआ - ५५ जागांवर विजयी

शिवसेना - ३ जागांवर विजयी

भाजप - १ जागेवर विजयी

अपक्ष - २ जागेवर विजयी

सकाळी @ ११.००

बविआ - ८३ जागांवर आघाडीवर

शिवसेना - ८ जागांवर आघाडीवर

काँग्रेस - १ जागेवर आघाडीवर

अपक्ष - १ जागेवर आघाडीवर

सकाळी @ १०. ३०

बविआ - ४३ जागांवर आघाडीवर

शिवसेना - ६ जागांवर आघाडीवर

सकाळी @ १०.१५

बविआ - १९ जागांवर आघाडीवर

शिवसेना - २ जागांवर आघाडीवर

वसई विरार महापालिकेवर सत्ता कोणाची? आज मतमोजणी

पालघर : वसई विरार महापालिकेच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरवात होणार आहे. एकूण ११ मतदान केंद्रावर मतमोजणी सूर होणार आहे. १११ जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल लागणार आहे.

या निवडणुकीत  बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत आहे. कारण सेना प्रथमच या निवडणुकीत इतक्या ताकतीने उतरत आहे. सेनेचे अनेक दिग्गज नेते गेल्या काही दिवसांपासून वसईत ठाण मांडून होते. यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला सेनेचे कडवे आव्हान आहे.

सेना भाजप आणि रिपाई यांनी युती करून हि निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण अतिंम दिवसात रिपाई  जागा वाटपाच्या वादावरून बहुजन विकास आघाडीला साथ देत १ जागा बिनविरोध निवडून आणली. याचा दणका मात्र महायुतीला बसला आहे. बहुजन विकास आघआडीच्या आधीच ३ जागा बिन विरोध निवडून आल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.