पावसाची दडी, भाज्या महागल्यात

 पावसानं दडी मारल्यानं त्याचे परिणाम भाजीच्या दरांवर होत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढलेत. 

Updated: Jun 25, 2014, 05:59 PM IST
पावसाची दडी, भाज्या महागल्यात title=

नवी मुंबई : पावसानं दडी मारल्यानं त्याचे परिणाम भाजीच्या दरांवर होत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढलेत. 

पालेभाज्या महाग झाल्या आहेत. टॉमेटो, वांगी, गवार यासारख्या भाज्यांचे भाव वाढले आहेत . घाऊक मार्केट मधील पालेभाज्याचे दर पुढील प्रमाणे - कोथिम्बीर - २५ ते ३० रुपये , मेथी २० ते २५ रुपये , पालक - ५ ते ७ रुपये , शेपू - २० ते ३० रुपये असा आहे. 

कोबी - १० ते १४ रुये किलो , गवार - ३० ते ४५ रुपये किलो , टोमेटो - १०० ते १५० , काकडी - ३० ते ३६ रुपये किलो , फ्लॉवर -१४ ते १८ रुपये कीलो , फरसबी - ५० ते ७० रुपये कीलो , वाग - २८ ते ३० रुपये किलो , मटार - ५० ते ६० रुपये किलो , तोंडली - २८ ते ३४ रुपये किलो , दोडका - २४ ते ३० रुपये , शेवगा - ४० ते ५० रुपये किलो आदी दराने विक्री करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.