व्हिडिओ : बारबालेच्या तालावर ठुमका लावतोय पोलीस!

पोलीस, बार गर्ल आणि डान्सचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. यावेळी ठाणे ग्रामीण भागातील काशिमिरा पोलीस ठाण्यातील एपीआय बार गर्लच्या तालावर थिरकल्याची माहिती पोलीस सूरांनी दिलीय. 

Updated: May 14, 2015, 05:11 PM IST
व्हिडिओ : बारबालेच्या तालावर ठुमका लावतोय पोलीस! title=

ठाणे : पोलीस, बार गर्ल आणि डान्सचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. यावेळी ठाणे ग्रामीण भागातील काशिमिरा पोलीस ठाण्यातील एपीआय बार गर्लच्या तालावर थिरकल्याची माहिती पोलीस सूरांनी दिलीय. 

घोडबंदर रोड वरील 'सी हॉक' बार मधील हे चित्रिकरण आहे. साधारणपणे १० ते १२ दिवसांपूर्वी काशिमिरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी बारबालेच्या तालावर थिरकल्याचं समजतंय. बारबालेवर या अधिकाऱ्यानं पैसे देखील उडवलेत. 

याआधी डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कॉन्स्टेबल संजय बाबर आणि मुलानी यांची डोंबिवलीतील इंद्रप्रस्थ बार मधील अश्लील डान्स करतानाची मोबाईल क्लीप समोर आली होती. वाढत्या दबावानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता पुन्हा असा प्रकार समोर आलाय.  

'सी हॉक' बारमध्ये बार बालाबरोबर नाचून पैसे उडवणारा पोलीस अधिकारी माहित असूनही वरीष्ठांकडून कारवाई होत नाही. तसंच खुलेआम डान्सबार सुरु असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. 

पाहा, व्हिडिओ :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.