उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

Updated: Sep 19, 2016, 12:58 PM IST
उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा title=

अमरावती : उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

५-६ दिवसांपूर्वी शहीद जवान विकास यांचे कुटुंबियांशी फोनवर बोलणं झाले होतं. महिन्याभरापूर्वीच त्यांची बदली कश्मीरमधील उरी या ठिकाणी झाली होती. विकास उईके हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच ग्रामस्थांनी त्यांच्या घरी गर्दी केली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x