पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला सुुरुवात

पुण्यात आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला आज ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. 

Updated: Nov 18, 2016, 02:33 PM IST
पुण्यात विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला सुुरुवात  title=

पुणे : पुण्यात आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संम्मेलनाला आज ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून गणेश कला क्रीडा रंगमंचापर्यंत ही दिंडी निघाली. दुपारी ४ वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. पद्मश्री सूरजितसिंग पातर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. 

उद्घाटन समारंभानंतर पंजाबी संस्कृतीचं दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. पुढील दोन दिवस हे संमेलन चालणार आहे. त्यामध्ये पंजाबी भाषा, साहित्य, लोककला, चित्रपट, संगीत या विषयांवर विचारमंथन होणार आहे. 

त्याशिवाय मराठी- पंजाबी पुस्तकांचं प्रदर्शन तसेच पंजाबी खाद्य पदार्थांची मेजवानी लाभणार आहे. जगभरातील सुमारे २००० प्रतिनिधी या संमेलनासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. संमेलनाचे आयोजन 'सरहद्द' संस्थेतर्फे करण्यात आलंय.