भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल 36 तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय..
गेल्या 4-5 वर्षांपासून पाठपुरावा करूनही पुरेसं पाणी मिळत नाहीये. त्यामुळे आपली राहती घरं विकण्याची वेळ नागरिकांवर आलीये. नव्या इमारतींना पाणी दिल्यास आधीपासून असलेल्या सोसायट्यांना फटका बसेल. त्यामुळे या बांधकामांना ना हरकत देतानाच पाण्याची हमी देता येणार नाही, असं पालिकेचं म्हणणं आहे.
दरम्यान, नव्या इमारतींना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास किमान 1 वर्ष लागेल, असं महापौर सांगतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.