लातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल

लातूरकरांना पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मिरजेत दाखल झाली आहे. मराठवाडा पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे.

Updated: Apr 10, 2016, 08:26 PM IST
लातूरकरांसाठी पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल title=

लातूर : लातूरकरांना पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मिरजेत दाखल झाली आहे.  मराठवाडा पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे. मात्र रेल्वेने पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर, लातूरकरांना काहीसा दिलासा दिला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज सकाळी 50 वॅगन असलेली रेल्वे गाडी मिरजेत दाखल झाली. साधारण 10 वॅगन पाणी भरून आज पहिली रेल्वे लातूरला रवाना होण्याची शक्यता आहे.

वारणा धरण ते मिरज रेल्वे स्टेशन यादरम्यानची पाईपलाईन अद्याप तयार झालेली नाही. म्हणून रेल्वेनं दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. आता त्याऐवजी रेल्वे जंक्शनमध्ये ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं. त्या ठिकाणाहून पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. हा प्रयत्न पूर्णत्वास नेऊन आजच लातूरसाठी रेल्वे रवाना करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता.