ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही

ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.

Updated: Aug 25, 2016, 11:52 PM IST
ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही title=

सातारा : ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.

आंतरराष्टीय धावपटू ललिता बाबरचे सातारा शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सातारा शहरातील गांधी मैदानमधून जंगी मिरवणुकीला सुरवात झाली. ललिताला फेटा बांधून ओपन जीपमधून शहरातून रॅली काढण्यात आली.

यावेळी ललिताच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यार्थी उभे होते. यावेळी सातारकरांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाहू स्टेडियममध्ये ललिता आणि तिच्या आई-वडिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 2020 मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकून आणण्याचा विश्वास तिने बोलून दाखवलाय.