पुण्यात वडार समाजाच्या जमिनी कुणी हडपल्या?

वडार समाजाच्या वतीने पुण्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. वडार समाजाने पुण्याच्या आसपास खाणींसाठी जमिनी घेतल्या आहेत. मात्र यातील अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत. 

Updated: Oct 24, 2016, 08:17 PM IST
पुण्यात वडार समाजाच्या जमिनी कुणी हडपल्या? title=

पुणे : वडार समाजाच्या वतीने पुण्यात पोलीस आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. वडार समाजाने पुण्याच्या आसपास खाणींसाठी जमिनी घेतल्या आहेत. मात्र यातील अनेक जमिनी परस्पर विकल्या गेल्या आहेत. 

समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जमीन माफियांनी या जमिनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या आहेत. अशा जमीन माफियांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हावेत. यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. 

पुणे स्टेशन जवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र वडारी संघर्ष कृती समितीने या मोर्चाचे आयोजन केलं होतं.