गदीमा प्रतिष्ठानच्या गदीमा पुरस्कारांची घोषणा

ज्येष्ठ कवी, चतुरस्त्र लेखन आणि मराठी साहित्य विश्वातलं एक आदरस्थान ग. दी. माडगुळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा गदीमा पुरस्कार दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला. 

Updated: Nov 21, 2016, 08:50 PM IST
गदीमा प्रतिष्ठानच्या गदीमा पुरस्कारांची घोषणा

पुणे : ज्येष्ठ कवी, चतुरस्त्र लेखन आणि मराठी साहित्य विश्वातलं एक आदरस्थान ग. दी. माडगुळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा गदीमा पुरस्कार दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source

गदीमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. गदीमांच्या पत्नी विद्याताई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणाताई तांबे यांना तर नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १४ डिसेंबरला गदीमा स्मृती समारोहात अरूण काकडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल. 

गदीमा स्मारकाच्या मुद्दाही यावेळी चर्चेत आला. वारंवार पाठपुरावा करूनही अजून स्मारकाची वीटही रचली गेली नाही याची खंत व्यक्त करण्यात आली.

About the Author