सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.
येत्या २४ मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान आणि १५ एप्रिलला निकाल असणार आहे.
या जागेवर आर आर पाटील यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून निवडणूक जाहीर होताच आबांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
यापूर्वी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते प्रतीक पाटील यांनी पक्षश्रेष्टींकडे विनंती केली आहे.
कारण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे तासगावमध्ये आबांच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळाली, तर भाजप राष्ट्रवादीच्या निर्णयाची परतफेड करणार का?, याकडे तासगाव मतदार संघाचं लक्ष लागून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.