जैतापूर ऊर्जा प्रकल्प : भाजपकडून शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली

सत्तेत भागीदार असलेले शिवसेना- भाजप एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयत. जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाविरोधातल्या शिवसेनेच्या मोर्च्यामुळे कोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय. १७ मार्चला शिवसेनेनं जनआंदोलनाची हाक दिलीय. भाजपकडून मात्र या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आलीय. 

Updated: Mar 10, 2015, 11:45 PM IST
जैतापूर ऊर्जा प्रकल्प : भाजपकडून  शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली  title=

रत्नागिरी : सत्तेत भागीदार असलेले शिवसेना- भाजप एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयत. जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाविरोधातल्या शिवसेनेच्या मोर्च्यामुळे कोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय. १७ मार्चला शिवसेनेनं जनआंदोलनाची हाक दिलीय. भाजपकडून मात्र या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आलीय. 

आघाडी सरकारच्या काळात जैतापूर प्रकल्पावरून रान उठवत शिवसेनेनं कोकणातल्या जनतेला आपल्या बाजूनं वळवून घेण्यात मोठं यश मिळवलं होतं. केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता आल्यावर तरी जैतापूरसंदर्भात निर्णय होईल असं अपेक्षित होतं. पण सत्तेत आलेले शिवसेना आणि भाजप एकमेकांची कुरघोडी करण्यातच दंग असल्यामुळे कुठलाच अपेक्षित निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही.

आता शिवसेनेनं भाजपवर कुरघोडी करण्यासाठी मोर्चाचं हत्यार उपसलंय. १७ मार्चला शिवसेना प्रकल्पाविरोधात मोर्चा काढतेय.  प्रकल्पस्थळावर मोर्चाला किती प्रतिसाद मिळेल याबाबत साशंक असल्यामुळेच रत्नागिरीत मोर्चा काढण्याची सावध भूमिका शिवसेनेनं घेतलीय.  हाच मुद्दा पकडून रत्नागिरीतल्या भाजपनं सेनेला टार्गेट केलंय. 
 
गेल्या काही महिन्यात जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनं शिवसेनेनं एकही लढा रस्त्यावर उतरून न केल्यानं प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या बाजूनं किती राहतील याची भीतीही शिवसेनेच्या मनात आहे. मात्र जैतापूरच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.