पतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश

घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने  मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. 

Updated: Oct 14, 2016, 07:01 PM IST
पतीला पोटगी देण्याचे कमविणाऱ्या पत्नीला आदेश title=

सोलापूर : घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकीमुले पेशाने  मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे. 

याप्रकरणी सोलापूर दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) व्ही. पी. पाटील यांनी सुनावणी करताना पतीला अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश त्याच्या पत्नीस दिला. 

पत्नीकडून पतीस पोटगी मिळण्याचा हा पहिलाच निकाल असल्यामुळे सर्वत्र या निकालाची चर्चा होत आहे.

प्रशांत व अर्चना (दोघांचे नाव बदलेले) यांचा विवाह २४ नोव्हेंबर २००४ रोजी सांगली जिल्हा जत तालुक्यातील गुड्डापूरच्या दानम्मादेवी देवस्थान येथे झाला. अर्चना ही उच्च शिक्षित तर प्रशांत अल्पशिक्षित आहे. प्रशांत हा सांगली जिल्ह्यातील तर अर्चना ही सोलापूर जिल्ह्यात राहणारी. प्रशांतच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही अर्चनाने त्याच्याशी लग्न केले. 

घरजावई झाला 

लग्न करताना तिने घरजावाई होण्याची अट घातली. तसेच घरातील सर्व कामे तुलाच करायला लागतील, असेही मान्य करुन घेतले. त्यानुसार प्रशांत सर्व कामे करायचा. एक दिवशी घरात प्रशांतच्या हातून दुध सांडले. एवढ्या कारणावरून संगीताने शिवीगाळ करून त्याला मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. 

माफी मागितली पण...

प्रशांतने अर्चनाची माफी मागितली, दयायाचना केली. पण तिने काही ऐकले नाही. घरातून बाहेर पडल्यावर प्रशांतचे हाल झाले. अखेर कंटाळून त्याने दिवाणी न्यायालयात हिंदू विवाह कलम ९ व १४ अन्वये अर्चना हिने आपणास नांदवण्यासाठी घरात घ्यावे आणि प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोटगी मिळावी, अशी मागणी केली. 

सर्व परिस्थिती पाहून न्यायालयाने अर्ज दाखल केल्यापासून प्रशांतला दरमहा दोन हजार रुपये पोटगी द्यावे असे अर्चनाला आदेश दिले. याप्रकरणी अर्जदार पतीकडून अॅड. जयदीप माने आणि अॅड. मनोज गिरी यांनी काम पाहिले.

काय काम करत होता प्रशांत

लग्नाच्या वेळी झालेल्या अलिखित करारानुसार अर्चनाने प्रशांतवर घरातील सर्वच कामे लादली होती. इतकेच नव्हे तर ती प्रशांतकडून हात- पाय देखील चेपून घेत होती.  किरकोळ चुकीबद्दल त्याला घराबाहेर काढण्यात आले होते.