कांद्याचे निर्यातमूल्य कमी करणार : सहकारमंत्री

कांद्यांचं निर्यातमूल्य वाढवल्यानं शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरलीय. त्यामुळे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिली. 

Updated: Jul 7, 2015, 11:38 AM IST
कांद्याचे निर्यातमूल्य कमी करणार : सहकारमंत्री title=

अहमदनगर : कांद्यांचं निर्यातमूल्य वाढवल्यानं शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरलीय. त्यामुळे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहमदनगरमध्ये दिली. 

या मुद्यावर वेळप्रसंगी राज्याचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रात जाऊ, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर साखर आणि कांद्यांला सपोर्ट प्राईस द्यावी लागेल. त्यासाठी केंद्र सरकारला निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एफआरपी संदर्भआत मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राच्या १ हजार ९५० कोटींच्या मदतीच्या अध्यादेशाचा ठराव करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र केंद्राच्या मदतीनंतरही कारखान्यानं एफआरपी दिला नाही तर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही सहकार मंत्र्यांनी दिला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.