ट्रॅक्टरवर पिकनिकला निघाले असताना अपघात

नागपूर शहरातील टेलिकॉमनगर सखी महिला मंडळाचे सदस्य आज या पर्यटनस्थळी पिकनिकसाठी आले होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2017, 07:57 PM IST
ट्रॅक्टरवर पिकनिकला निघाले असताना अपघात title=

चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड शहराजवळ घोडाझरी तलाव पर्यटनस्थळी नागपुरातील महिला मंडळाच्या एका पिकनिक चमूच्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे. यात एकूण ४६ महिला जखमी झाल्या आहेत. यातील ६ गंभीर महिलांना नागपूरच्या रुग्णालयात  हलविण्यात आले आहे. नागपूर शहरातील टेलिकॉमनगर सखी महिला मंडळाचे सदस्य आज या पर्यटनस्थळी पिकनिकसाठी आले होते. 

पायी मार्गाने पर येताना थकलेल्या महिलांनी या भागातून प्रवेशद्वारापर्यंत एका ट्रॅक्टरवर जाणे पसंत केले. हाच ट्रॅक्टर भरधाव वेगात असताना एका वळणावर उलटला. यात सर्व महिला जखमी झाल्या. यातील ६ महिलांना जखमी अवस्थेत नागपूरच्या सिम्स आणि न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर ४० महिलांना सिंदेवाही आणि नागभीडच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे