याकूबला बर्थ डे गिफ्ट... फाशी!

अखेर न्यायाचा सूर्य उगवलाय. तब्बल २२ वर्षानंतर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील २५७ पीडितांना न्याय मिळालाय, असं म्हणता येईल.

Updated: Jul 31, 2015, 08:56 AM IST
याकूबला बर्थ डे गिफ्ट... फाशी! title=
न्यायाचा सूर्य उगवला!

बडा कब्रस्तानमध्ये याकूबचा दफनविधी पूर्ण

मुंबई पोलिसांची खबरदारी
- याकूबच्या दफनविधीसाठी मुंबई पोलिसांनी 'रुट मॅप' बनवला
- पोलिसांच्या फौजफाट्यात मुंबई पोलीस कमांडोची एक टीमही असेल
- माहिमहून - मरीन लाइन्सच्या बडे कब्रस्तानच्या रोडची आखणी केली
- हाजीअलीजवळ एक अतिरिक्त आयुक्त आणि एक डीसीपी मिड पॉईंट सांभाळतील
- मुंबईच्या या रुट मॅपवर ३००० पोलीस, ३ अतिरिक्त आयुक्त आणि २ डीसीपी अगोदरपासूनच तैनात असतील
- मुंबईच्या मरीन लाईन्सच्या बडे कब्रस्तानवर १ अतिरिक्त आयुक्त आणि २ डीसीपी अगोदरपासून असतील
- माहिमहून ते मरीन लाइन्सच्या रस्त्यावर ज्या ठिकाणांहून याकूब मेमनच्या शव जाईल.. त्या पोलीस स्टेशन्सला आपल्या भागात तैनात राहावं लागणार आहे 

दुपारी १.०८ वाजता 
- याकूबचा मृतदेह माहीम दर्गा इथं दाखल
- बडे कब्रस्तानमध्ये होणार याकूबचा दफनविधी
- पोलिसांनी फोटोग्राफर्सवर केली बंदी

दुपारी १२.३५ वाजता
- याकूबचा मृतदेह घेऊन कुटुंबीय मुंबईत दाखल
- थोड्याच वेळात याकूबच्या घरी मृतदेह नेणार
- याकूबच्या माहिमच्या घराजवळ ५०० पोलीस तैनात

सकाळी १०.०० वाजता

याकूबचा मृतदेह नागपूर विमानतळावर दाखल... मुंबईसाठी थोड्याच वेळात होणार रवाना

सकाळी ८.५० वाजता
- तुरुंग प्रशासनानं याकूबच्या कुटुंबीयांकडून हमीपत्र घेतलं
- कुठलीही गैरवर्तणूक होणार नाही याची काळजी घ्या, तुरुंग प्रशासनाची याकूबच्या कुटुंबीयांना सक्त ताकीद

सकाळी ८.४५ वाजता
- याकूबच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण
- सकाळी १०.३० वाजता एअर एम्ब्युलन्सनं याकूबचा मृतदेह मुंबईला आणणार

सकाळी ८.०० वाजता
- याकूबचा भाऊ सुलेमान मेमन आणि चुलत भाऊ उस्मान मेमन नागपूरच्या हॉटेलमधून नागपूर कारागृहाकडे रवाना
- याकूबचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोन्ही भाऊ नागपूरमध्ये

सकाळी ७.५५ वाजता
- याकूबची पत्नी राहीन आणि मुलगी कुठे आहेत? याविषयी माहिती मिळालेली नाही.
- पण, याकूबचे भाऊ थांबलेल्या नागपूरातील हॉटेल द्वारका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळी ७.५० वाजता
- मुंबईत तणाव नाही, पण पोलिसांचा चोख बंदोबस्त
- मुंबई पोलिसांनी सावधानता म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या ४०५ जणांना घेतलं ताब्यात

अमेरिकेची ट्रॅव्हल अॅडव्हायजरी
- अतिरेकी हल्ल्याच्या भीतीनं अमेरिकन नागरिकांना इशारा
- भारतासह इतर देशांतील अमेरिकन नागरिकांना इशारा 
- भारतात असलेल्या परदेशी नागरिकांना टार्गेट केलं जाण्याची शक्यता

सकाळी ७.३० वाजता
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११ वाजता याकूब मेमनविषयी विधानसभेत करणार भाष्य  

सकाळी ७.२५ वाजता
- सकाळी १०.३० वाजता कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार याकूबचा मृतदेह
- दुपारी १२ वाजता मुंबईला आणलं जाणार
- दुपारी १ - २ वाजता मुंबईत चंदनवाडीत होणार याकूबचा दफनविधी

सकाळी ७.२० वाजता
- याकूबच्या कुटुंबीयांची तुरुंगात प्रतीक्षा 
- दोन्ही भावांकडे सोपवला जाणार याकूबचा मृतदेह
- उस्मान, सुलेमान अजूनही तुरुंगात दाखल झालेले नाहीत

सकाळी ७.१५ वाजता
- याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला जाणार, तुरुंग अधिकाऱ्यांचा निर्णय
- मुंबईत होणार दफनविधी

सकाळी ७.१० वाजता
- याकूब मेमनचा मृतदेह ताब्यात मिळावा, कुटुंबीयांची मागणी
- नागूपर एअरपोर्टवर कडेकोट सुरक्षा
- मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई / नागपूर : मुंबईतल्या 1993 बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमन फासावर चढवण्यात आलंय, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिलीय.

अखेर न्यायाचा सूर्य उगवलाय. तब्बल २२ वर्षानंतर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील २५७ पीडितांना न्याय मिळालाय, असं म्हणता येईल. याकूबच्या बचावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'बचावा'चा प्रयत्न करण्यात आला. पण, यात त्याला यश मिळालं नाही. 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशातल्या सर्वोच्च न्यायालायनं पहाटे चार वाजून अठ्ठवन्न मिनिटांनी  याकूबच्या फाशीवर  शिक्कामोर्तब केलं. बुधवारी रात्री 10 वाजता राष्ट्रपतींनी याकूबची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. त्यानंतर नाट्यमय घडामोडीं घडल्या.

रात्री 11च्या ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर न्यायाधीश एच एल दत्तू यांची भेट घेतली. मध्यरात्री सुप्रीम कोर्टाने तीन न्यायमूर्तींचं बेंच स्थापन करुन सुनावणी करण्याचा निर्णय  घेतला.. पहाटे 3.20 मिनिटांनी सुनावणी सुरू झाली. यावर सुनावणी सुरु होताच याकूबच्या वकीलांनी याकूबला 14 दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी केली.. तर 14 दिवसांची मुदत एकदाच मिळते वारंवार नाही असा युक्तीवाद सरकारी पक्षानं केला.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर याकूबला पूर्ण वेळ देण्यात आल्याचं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं याकूब मेमनची याचिका फेटाळली.. त्यामुळं याकूब मेमनला आता नागपूर जेलमध्ये 6.30 ते 7 वा. दरम्यान फासावर लटकवण्यात येणार आहे. याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रीम कोर्टानं अखेरचं शिक्कामोर्तब केल्यानंतर नागपुरात घडामोडींना वेग आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.