जळगाव : जिल्ह्यातील अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयात तरूणाने महिला प्राध्यापकाला मारहाण झाली आहे. वर्गात शिकवत असताना, बाहेरून येऊन तरूणाने महिला प्राध्यापकाला मारहाण केली. तुषार जाधव असं या तरुणाचे नाव आहे.
खोली क्रमांक १६ मध्ये भूगोल विषयाचे लेक्चर घेत असताना तोंडाला रुमाल बांधून हातात काचेची बाटली घेत जाधव हा वर्गात शिरला, त्याने प्राध्यापक कविता सूर्यवंशी यांच्या कानशिलात लगावली तसेच पोटावरही लाथ मारल्याचं सांगण्यात येत आहे. तुषार जाधव हा हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्नात होता, मात्र विद्यार्थ्यांनीच त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
या घटनेनंतर प्राध्यापक कविता सूर्यवंशी या घाबरल्या आहेत. अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात बाहेरचा तरुण आला आणि त्याने महिला प्राध्यापकावर हल्ला चढवल्ला, मात्र संचालकांनी साधी भेट देण्याचीही तसदी घेतलेली दिसत नाही. एका महिला प्राध्यापकावर झालेल्या या हल्ल्याचा प्राध्यापक संघटनेन निषेध केलाय.
यापूर्वीचं प्रा.डॉ.एल.ए.पाटील यांना प्राचार्यपदावरून संचालक मंडळाने हटवलं आहे, याविरोधात शहरात जोरदार निदर्शनं सुरू आहेत. मात्र प्राचार्य आणि प्राध्यापक संघटनेने याविषयी गंभीर नसल्याचं दिसतंय. डॉ.एल.ए.पाटील यांनी एका संचालक पुत्र असलेल्या प्राध्यापकाला चोरी करतांना पकडल्याने, त्यांना प्राचार्यपदावरून हटवण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. प्रा.डॉ.एल.ए.पाटील यांनी सर्वच बाबतीत शिस्तपालनाला महत्व दिल्याने त्यांची लोकप्रियता वाढली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.