गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर

गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि  करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.

Updated: Aug 13, 2014, 04:26 PM IST
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर  title=

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि  करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 02005 प्रिमियम एसी डबल डेकर ही विशेष गाडी 05.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. (ठाणे येथे 06.02 वाजता तर पनवेल येथून 06.50 वाजता) 22, 24, 26, 28, 30 ऑगस्ट आणि 1, 3, 5, 7, सप्टेंबर 2014 9 (10 ट्रिप) आणि त्याच दिवशी 16.30 वाजता करमाळीला पोहोचेल. 
 
तर परतीसाठी गाडी क्रमांक 02006 प्रिमियम एसी डबल डेकर ही विशेष गाडी करमाळी येथून 06.00 वाजता सुटेल 23, 25, 27, 29, 31 ऑगस्ट, 2, 4, 6, 8, 2014 (10 ट्रिप) 10 सप्टेंबर रोजी 17.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. 

या मार्गावर ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली या स्टेशनवर ट्रेन थांबेल. या स्पेशल ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी केवळ इंटरेनटद्वारेच आरक्षण करु शकतात. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी 22 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत या ट्रेनची सेवा असेल. या कालावधीत 10 फेऱ्या होणार आहेत.

या गाडीला 8 डबल डेकर एसी, एक एसी खानपान डबा, दोन  जनरेटर कम गार्ड रक्षक व्हॅन असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.