वखार महामंडळ गोदामातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

अन्न सुरक्षा योजनेतल्या गोरगरीबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेट भोवतीचे फास आज जिल्हा प्रशासनानं आवळले. झी मीडियानं काल हा घोटाळा उघड केला. झी मीडियाच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाई सुरू झालीय. 

Updated: Apr 10, 2015, 06:16 PM IST
वखार महामंडळ गोदामातील धान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश title=

रत्नागिरी: अन्न सुरक्षा योजनेतल्या गोरगरीबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या रॅकेट भोवतीचे फास आज जिल्हा प्रशासनानं आवळले. झी मीडियानं काल हा घोटाळा उघड केला. झी मीडियाच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाई सुरू झालीय. 

अन्न सुरक्षा योजनेतल्या गोरगरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारणारं रॅकेट झी मीडियाने उघड केलं. रत्नागिरी शहराच्या वखार महामंडळाच्या गोदामातून ग्रामीण भागात वितरणासाठी जाणारं धान्य कशापद्धतीने पळवलं जातं याचं धक्कादायक वास्तव झी मीडियानं उघड केलं. गोदामातून बाहेर पडणाऱ्या सत्तर ते ऐशी ट्रकमधून डल्ला मारला जात होता. 

मात्र हे रॅकेट उघड झाल्यावर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवून घेत पुरवठा विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस यांना रॅकेटमध्ये गुंतलेल्यावर कठोर कारवाईचे आदेश दिलेत. याचबरोबर जिल्ह्यात भरारी पथकं नेमून वाहतुकीदरम्यान अचानक तपासणी केली जाणार आहे.. चालक आणि गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

गरीबांच्या तोंडचा घास हिरावणारं हे मोठं रॅकेट झी मीडियाने उघड केलंय. यापुढेही अशा भ्रष्टाचारावर रोखठोक भूमिका झी मीडिया घेत राहणार आहे.. जिल्हाप्रशासनानेही ही कारवाई थंडावू देता कामा नये हीच अपेक्षा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.