www.24taas.com, ठाणे
ठाण्यात आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असंल तरी आठ वॉर्डवरुन मतभेद कायम आहेत. आज झालेल्या बैठकीतही त्याबाबत काहीच निर्णय होऊ शकला नाही. वॉर्ड क्रमांक १३, १५, ३६, ३७, ५४,५६, ५९, ६० या वॉर्डवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच आहे. त्यामुळं या वॉर्डांबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहे. उद्या त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेलेले शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेही उपस्थित होते.
ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागांविषयी बैठक झाली. काही दिवसांपूर्वी खळबळजनकरित्या राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत प्रवेश करणारे आनंद परांजपे हे देखील राष्ट्रवादीच्या या बैठकीला हजर होते.
आज ठाण्यात आघाडीची बैठक झाली पण अजूनही आघाडीत बिघाडी असल्याचे समजते आज झालेल्या बैठकीत आठ जागांवरून वाद हा सुरूच आहे. त्यामुळे आता ठाण्यात आघाडीचं नक्की काय होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आता याचा निर्णय उद्याच घेतला जाईल. तसचं आज झालेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीत आनंद परांजपेदेखील हजर होते