ठाणे: ठाण्यातील कासार वडवली येथे 14 जणांची हत्या करुन आरोपीनं आत्महत्या केलीये. हसनेन अन्वर वरेकर असं या आरोपीचं नाव असून तो पेशानं सीए असल्याचं कळतंय.
पहाटे 3च्या सुमारास हे हत्याकांड घडलं यात हुसेनची स्वताची दोन मुलं, आई, वडील, पत्नी, बहिणी आणि त्यांची दोन मुलं यांची हत्या केलीये.
रात्री हुसनेनं त्याच्या तीनही बहिणींना घरी जेवायला बोलावलं होतं. त्यानंतर त्यानं धारधार सु-यानं त्यानं या सर्वांची हत्या केली आणि स्वत:ला गळफास लावून घेतला. गळफास लावलेल्या अवस्थेमध्येच पोलिसांना त्याचा हातात सुरा सापडला आहे.
हसुेनची एक बहीण बेशुद्ध झाल्यानं ती वाचली, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिचा जबाब नोंदवण्याचं काम सुरु आहे.