www.24taas.com, मुंबई
इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.
सरकारच्या आश्वासानानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. स्मारकाचा आराखडा लवकरच केला जाईल असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर केलं. कार्यकर्ते मिल बाहेर काही कार्यकर्ते बसल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. तसंच या कार्यकर्त्यांनी मिलमध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला. यावेळी पोलीस आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
यापूर्वी इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तसंच ५० ते ७० आरपीआय कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या गेटवर चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.