अण्णांचे आंदोलन म्हणजे ढोंग- बाळासाहेब

अण्णांचे आदोंलन म्हणजे ढोंग आहे... असं म्हणंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे.

Updated: May 1, 2012, 09:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अण्णांचे आदोंलन म्हणजे ढोंग आहे...  असं म्हणंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. न्यूजमेकर लाईफटाईम या अवॉर्डच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकेर हॉटेल ट्रायडेंटमध्ये बोलत होते. बाळासाहेंबानी त्यांच्या ठाकरी शैलीत अण्णा हजारे यांना 'टार्गेट' केलं. बाळासाहेबांनी अण्णांचा चागंलाच समाचार घेतला.

 

त्यांनी अण्णांवर ज्याप्रमाणे शरसंधान साधलं तसच अभिनेता सैफ अली खानवरही हल्लाबोल केला. बाळासाहेबांनी 'अण्णाचं आंदोलन म्हणजे ढोंग आहे', असं म्हणतं अण्णांवर ज्याप्रमाणे हल्लाबोल केला त्याचप्रमाणे सैफ अली खानवर टीकास्त्र सोडलं, सैफ अली खानला पद्मश्री कशासाठी? दोन बायका केल्या म्हणून सैफ अलीला पद्मश्री? असं म्हणतं बाळासाहेबांनी पुरस्कार देण्याबाबतही शंका व्यक्त केली.

 

'राजकारण हे खालच्या पातळीला गेलं आहे', 'जिथे पाहावं तिथे अण्णा अण्णा सुरू आहे', 'अण्णा प्रत्येक न्यूज चॅनलवर दिसत असतात'. त्यामुळे त्यांनी पत्रकारांवर देखील टीका केली. 'पत्रकारिता खालच्या दर्जावर गेलेली आहे', 'सगळीकडे पेड न्यूजच पेव फुटलं आहे'.  अशी टीका बाळासाहेबांनी पत्रकारांवरही केली.

 

'आता व्यंग्यचित्र काढायला आता चेहरा उरला नाही, पेड न्यूजने पत्रकारितेला भवितव्य नाही, व्यंगचित्रकार खल्लास झाले आहे, मी पारितोषिक स्वीकारत नाही कारण सध्या सैफ अलीला पण पद्मश्री मिळतोय . असं म्हणत बाळासाहेबांनी तुफान फटकेबाजी केली.