अदनान पत्रावालाच्या आरोपींची निर्दोष सुटका

मुंबईतल्या ओशिवरामधील अदनान पत्रावाला अपहरण आणि हत्येप्रकरणी चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकारी वकील कटाची थिअरी कोर्टासमोर मांडू न शकल्यामुळे या केसमधील चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Updated: Jan 30, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या ओशिवरामधील अदनान पत्रावाला अपहरण आणि हत्येप्रकरणी चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकारी वकील कटाची थिअरी कोर्टासमोर मांडू न शकल्यामुळे या केसमधील चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

ऑगस्ट २००७ मध्ये १६ वर्षाच्या अदनान पत्रावालाची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. अपहरणानंतर २ कोटी रुपयांची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागितली होती. अदनानचं अपहरण त्याचाच पाच मित्रांनी केल होतं. हत्येनंतर अदनानचा मृतदेह नवी मुंबईच्या पामबिचजवळ मिळाला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाचही आरोपींना अटक केली होती.

ऑगस्ट २००७ च्या अदनान पत्रावाला केस प्रकरणाचा आज निर्णय आलेला आहे. १६ वर्षाचा अदनान पत्रावालाचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. अपहरणानंतर २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पण ते देखील कोर्टात सिद्ध करता आलेलं नसल्याने आरोपी मोकाट सुटले आहेत. अदनानचं अपहरण त्याचाच पाच मित्रांनी केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी पाचही आरोपींना अटक केलं होतं मात्र या पाचही आरोपींची सेशन कोर्टाने मुक्तता केली आहे.