www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय मार्गावर कितीही पाऊस पडला तरी सिग्नल यंत्रणा खराब होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केलाय.
रेल्वे ट्रॅकवर पाणी येत सिग्नल नादुरुस्त होऊ नये यासाठी ‘डिजिटल एक्सल काऊंटर’ ही नवीन, अत्याधुनिक यंत्रणा रेल्वेने बसवली आहे. यामुळे सिग्नलची यंत्रणा पाण्याखाली जाऊन सुद्धा सुस्थितीत सुरु राहील असा दावा रेल्वेने केलाय. विशेषतः कुर्ला-शीव, भांडुप, चुनाभट्टी, वडाळा या भागातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचतं. म्हणूनच सिग्नल यंत्रणा भर पावसातही अखंड सुरु राहावी, यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललंय.
थोडा जरी जादा पाऊस झाला की ताबडतोब मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा कोडलमडल्याचा अनुभव दरवर्षी रेल्वे प्रवाशांना येत असतो. यामुळे या परिसरातील सिग्नल यंत्रणाही नादुरुस्त होतात.
.