आदर्श घोटाळा : सुशीलकुमार शिंदेंची पलटी

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकमार शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर आज साक्ष नोंदवली. आदर्श सोसायटीच्या अलॉटमेंटचं लेटरवर सही केली होती. तेंव्हा त्यांना पर्यावरण मंत्रालयानं NOC दिली होती की नाही हे आपल्याला आठवत नसल्याचं यावेळी शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर सांगितलं.

Updated: Jun 25, 2012, 02:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकमार शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर आज साक्ष नोंदवली. आदर्श सोसायटीच्या अलॉटमेंटचं लेटरवर सही केली होती. तेंव्हा त्यांना पर्यावरण मंत्रालयानं NOC दिली होती की नाही हे आपल्याला आठवत नसल्याचं यावेळी शिंदे यांनी चौकशी आयोगासमोर सांगितलं.

आदर्श प्रकरणी जी कागदपत्रं सादर करण्यात आली होती. त्याची स्क्रूटनी मंत्रालयातल्या विविध विभागाच्या सचिवांनी केली होती असंही शिंदे यांनी आयोगासमोर सांगितलं शिंदे /यांच्या पाठोपाठ 27 जूनला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांची तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची 30 जूनला साक्ष नोंदवली जाणार आहे.

2003-04 मध्ये मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदेंनी आदर्श सोसायटीच्या फाईलींवर स्वाक्षरी केल्याचा पुढं आलंय. तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी सामान्य नागरिकांना आदर्श सोसायटीतील 40 टक्के फ्लॅट्स देण्य़ाबाबत प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची सही असल्यानं शिंदेही अडचणीत आले आहेत. शिंदेंनी मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात या आरोपांचा इन्कार केला असून जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळालेल्या कागदपत्रांवरच सही केल्याचा दावा केलाय.

व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="127011"]