आयएनएस विंध्यगिरी नष्ट करणार

आयएनएस विंध्यगिरी नष्ट करायला मुंबई हायकोर्टानं परवानगी दिलीय सुमारे एक वर्षानंतर ही परवानगी देण्यात आलीय.३० जानेवारी२०११ रोजी आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती. मात्र विंध्यगीरीमुळे इतर जहाजांना धोका निर्माण झाला होता.

Updated: May 9, 2012, 09:53 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

आयएनएस विंध्यगिरी नष्ट करायला मुंबई हायकोर्टानं परवानगी दिलीय सुमारे एक वर्षानंतर ही परवानगी देण्यात आलीय. ३० जानेवारी २०११ रोजी आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती. मात्र विंध्यगीरीमुळे इतर जहाजांना धोका निर्माण झाला होता. परिणामी ती नष्ट करण्यासाठी अखेर न्यायालयात याचिका करावी लागली. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर विंध्यगिरी नष्ट करायला हिरवा कंदील मिळाला आहे.

 

 

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जेएनपीटी बंदरात विंध्यगिरी व सायप्रसच्या एम.व्ही.नॉर्डलेक या मालवाहू जहाजाची टक्कर झाली होती. या अपघातानंतर विंध्यगिरी कोणत्याही मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता नसल्याने ही युद्धनौका मोडीत काढण्याची परवानगी नौदलाने कोर्टाकडे मागितली होती. नौदलाची बाजू ऐकल्यानंतर न्या. रोशन दळवी यांनी ही युद्धनौका मोडीत काढण्यास परवानगी दिली.

 

 

जेएनपीटी बंदरात ३० जानेवारी २०११ रोजी नौदलाची विंध्यगिरी आणि एम.व्ही. नॉर्डलेक या मालवाहू जहाजाची टक्कर झाली होती. अपघातानंतर या युद्धनौकेवर आगही लागली होती. या युद्धनौकेवर शस्त्रसाठा तसेच दारुगोळ्याचा साठा आहे. अपघातानंतर ही युद्धनौका वर्षभर नौदलाच्या गोदीत उभी आहे. अशी युद्धनौका गोदीत उभी करणे हे गोदीच्या व राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. गोदीच्या परिसरातून मालवाहू जहाजांची वाहतूक सुरू असते. दारुगोळा असलेली नौका उभी करून ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे ही युद्धनौका मोडीत काढण्यासाठी नौदलाच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.