उद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.

Updated: Feb 4, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.

तर चर्चगेट ते विरार पर्यंतचा मार्ग AC विद्युत परीवर्तीत होणार आहे. सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. तर लांब पल्ल्याच्या गाड्या डिझेल इंजिन लावून चालवण्यात येणार आहेत.

मार्गाचं संपूर्ण विद्युत परिवर्तन झाल्यानं लोकल वाहतूक जलद होऊन, प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे