चर्चगेट ते डहाणू रोड थेट लोकल नाही- पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते डहाणू रोड अशी थेट लोकल ट्रेन सुरू करणं शक्य नाही, असं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

Updated: Jan 18, 2012, 11:08 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

चर्चगेट ते डहाणू रोड अशी थेट लोकल ट्रेन सुरू करणं शक्य नाही, असं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीनं हायकोर्टात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात चर्चगेट-डहाणू रोड आणि विरार-डहाणूरोड अशा थेट लोकल ट्रेन्स तांत्रिक साधनांच्या अभावामुळं सुरु करता येणार नाहीत, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

 

वसईतील नगरसेवक राजकुमार चोरगे यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. उत्तर मुंबईत राहणा-या नागरिकांच्या सोयीसाठी चर्चगेट-डहाणू रोड सुरु करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती. विरारवरून डहाणूसाठी असलेल्या शटल रेल्वेची फ्रिक्वेन्सी कमी असून ब-याचदा या प्रवासासाठी नागरिकांचे सहा-सहा तास वाया जातात, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता.