पंचायतीचा दावा, ९०००० कमावणारा गरीब 'बावा'!

प्रति महिना नव्वद हजार रुपये मिळकत असलेला पारसी गरीब असल्याचं नुकतंच बॉम्बे पारसी पंचायतीनं हायकोर्टात स्पष्ट केलंय. मुंबईतील पारसी समाजासाठी आरक्षित घरांसाठी गरीब पारसीचा हा निकष असून एका सुनावणी दरम्यान बॉम्बे पारसी पंचायतीनं गरीब पारसीची ही व्याख्या तयार केली आहे.

Updated: Jun 12, 2012, 10:40 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

ज्याला रोजच्या जगण्याची भ्रांत, ज्याला एकवेळच्या जेवणाचीही चिंता असते तो गरीब अशी तुम्हा आमची गरीबीची सर्वसाधारण कल्पना असते. नियोजन आयोगानं ठरवल्याप्रमाणे शहरी भागात दर दिवसाला 29 रुपये खर्च करणारी व्यक्ती गरीब अशी व्याख्या आहे.

 

पण 'बाँबे पारसी पंचायती'नं ठरवलेला गरीब मात्र वेगळाच आहे. प्रति महिना नव्वद हजार रुपये मिळकत असलेला पारसी गरीब असल्याचं नुकतंच बॉम्बे पारसी पंचायतीनं हायकोर्टात स्पष्ट केलंय. मुंबईतील पारसी समाजासाठी आरक्षित घरांसाठी गरीब पारसीचा हा निकष असून एका सुनावणी दरम्यान बॉम्बे पारसी पंचायतीनं गरीब पारसीची ही व्याख्या तयार केली आहे.

 

मुंबईमध्ये सुमारे ४५ हजार पारशी राहात असल्याची माहिती देण्यात येत आहे. अल्पसंख्यांक असणाऱ् पारशी समाजासाठी ५००० घरांची व्यवस्था करण्यात आली आहे. या आधी प्रति महिना रुपये ५०,००० पेक्षा कमी मासिक प्राप्ती असणाऱ्या परशी व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालील माण्यात येत होतं. मात्र, आता मासिक प्राप्ती ९०,००० रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या पारशी ‘बावाजी’ला गरीब मानण्यात यावं असं बाँबे पारसी पंचायतीचं म्हणणं आहे.