पोलीस महासंचालकपदी संजीव दयाळ?

राज्याचे पोलीस महासंचालक के. सुब्रमण्यम आज निवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी कुणाची नियुक्ती होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलंय.

Updated: Jul 31, 2012, 03:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्याचे पोलीस महासंचालक के. सुब्रमण्यम आज निवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी कुणाची नियुक्ती होणार याकडेच सर्वाचं लक्ष लागलंय.

 

पोलीस महासंचालकपदासाठी संजीव दयाळ यांचं नाव आघाडीवर आहे. १९७७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या दयाळ यांनी यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरही काम केलंय. १९८४ पासून मुंबईत काम करत असताना त्यांनी कुख्यात गुंड वरद राजन मुदलीयार ऊर्फ वरदाभाई याचं क्राईम नेटवर्क उद्धस्त केलं होतं. १९९० साली त्यांनी इंटिलिजन्स ब्युरोमध्ये काम केलं. मुंबईचे पोलीस आयुक्त असतानाच त्यांच्या कार्यकाळातच कुर्ल्यातील सिरीअल किलर जावेद शेख याला अटक करण्यात आली होती. दयाळ सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

.