www.24taas.com, मुंबई
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृत्ती उत्तम असून त्यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी शिवसेनाप्रमुखांना शनिवारी संध्याकाळपासून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आज आणखी काही वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या काळजी करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बाळासाहेबाचं वय ८५ वर्ष असल्याने त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. त्यामुळे नियमित चाचणीसाठी बाळासाहेबांना रूग्णालयात नेले जाते. लवकरच त्यांना सोडण्यात येणार आहे.